मातोश्रीत चाकू हल्ल्यात २ जण जखमी

शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान म्हणून ओळख असणाऱ्या मातोश्रीत झालेल्या चाकूहल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही भांडण दोन नोकरांमध्ये झाली, यात भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यास आलेली एक महिला नोकरही जखमी झाली आहे.

Updated: Nov 16, 2015, 03:25 PM IST
मातोश्रीत चाकू हल्ल्यात २ जण जखमी title=

मुंबई : शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान म्हणून ओळख असणाऱ्या मातोश्रीत झालेल्या चाकूहल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही भांडण दोन नोकरांमध्ये झाली, यात भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यास आलेली एक महिला नोकरही जखमी झाली आहे.

मातोश्रीच्या पहिल्या मजल्यात सध्या काही नोकर राहतात, दुसऱ्या मजल्यावर बाळासाहेब ठाकरे यांचं वास्तव्य होतं, मात्र आता तो मजलाही फारसा वापरात नाही. तिसऱ्या मजल्यावर उद्धव ठाकरे राहतात, तेथील किचनजवळ हा प्रकार झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

या हल्ल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याचंही सांगण्यात येत आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नेहमीच झेड दर्जाची सुरक्षा असते, त्यामुळे या घटनेने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागलं आहे, भांडण करणारे हे दोन्ही नोकर नेपाळचे असल्याचं सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.