कुर्ला स्थानकावर साखळी चोरामुळे महिलेने गमवला जीव

कुर्ला स्थानकावर एका साखळी चोरामुळे महिलेला आपला जीव गमवावा लागला. साखळी चोराने महिलेच्या गळ्यातून साखळी चोरताना तिला हिसका दिला. त्यात ही महिला लोकल ट्रेन खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.

Updated: Dec 7, 2016, 04:39 PM IST
कुर्ला स्थानकावर साखळी चोरामुळे महिलेने गमवला जीव title=

मुंबई : कुर्ला स्थानकावर एका साखळी चोरामुळे महिलेला आपला जीव गमवावा लागला. साखळी चोराने महिलेच्या गळ्यातून साखळी चोरताना तिला हिसका दिला. त्यात ही महिला लोकल ट्रेन खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.

काल रात्री सव्वा आठच्या सुमारास हा प्रकार कुर्ला स्टेशनवर एक महिला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर घडला. मृत महिला कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनची वाट पाहत होती. त्यावेळी रफी बैरागी चरण नावाचा साखळी चोर अचानक माहिलेजवळ आला आणि गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतलं. त्यात या महिलेचा तोल गेला आणि रुळावर पडली त्याच वेळी अचानक सीएसटीकडून कल्याणला जाणारी लोकल प्लॅटफॉर्म वर आली. या लोकल खाली ही महिला आली.

आर पी एफ पोलीस आणि प्रवाश्यानी महिलेला ताबडतोब सायन रुग्णालयात उपचारासाठी नेलं. पण तिचा मृत्यू झाला होता. तर साखळी चोर हा पळून जात असताना प्रवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा सर्व प्रकार येथे असलेल्या सीसीटीव्ही त कैद झाला आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ