मुंबई रेल्वे स्थानकात महिलेवर पुन्हा हल्ला

मुंबईतल्या सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सीएसटी स्टेशनवर महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. कल्याणला जाणा-या लोकलमध्ये महिला डब्यात एका गरदुल्ल्यानं महिलेला हातात अॅसिड असल्याची भीती दाखवत, तिची बॅग आणि मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 24, 2013, 01:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
मुंबईतल्या सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सीएसटी स्टेशनवर महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. कल्याणला जाणा-या लोकलमध्ये महिला डब्यात एका गरदुल्ल्यानं महिलेला हातात अॅसिड असल्याची भीती दाखवत, तिची बॅग आणि मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला.
या महिलेने प्रसांगावधान राखून आरडाओरडा करत पोलिसांनी बोलावले. आणि पोलीसांनी त्या गर्दुल्याची तपासणी केली असता तो गरदुल्ल्याच्या हातात असलेल्या बाटलीत अॅसिड नसून पाणी होते. पोलिसांनी त्या गर्दुल्याला ताब्यात घेतले आहे. मात्र या निमित्तीनं गजबजलेल्या स्टेशनवरही महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. दरम्यान गृहमंत्री आर आर पाटील यांनी गर्दुल्यांवर कारवाई करण्याचं आश्वासनं दिले आहे.
मुंबईत एका महिला फोटो जर्नालिस्टवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे देशभर एकच खळबळ उडाली असतानाच पुन्हा मुंबईत हल्ल्याचा प्रकार झाल्याने संताप व्यक्त होत आहे. सामूहिक बलात्काराच्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत.मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी ही संतापजनक घटना घडलीय. त्यामुळे मुंबईत महिला सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित झालाय.
दिल्लीपेक्षा मुंबईमध्ये महिला सुरक्षित असल्याचा समज अखेर खोटाच ठरलाय. महालक्ष्मीच्या शक्ती मिलमध्ये फोटोजर्नलिस्ट तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे मुंबई पोलिसांचे आणि गृहमंत्री आर. आर. पाटलांचे नाक कापले गेलेय. आबांच्या राज्यात महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे वाढत असून, मुंबई ही सेफ सिटी नव्हे.. तर रेप सिटी बनतेय, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ