लालूंवर शस्त्रक्रिया, मोदींच्या शुभेच्छा

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर मुंबईत हृदय विकाराची शस्त्रक्रिया केली जात आहे. मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टीट्यूटमध्ये हे ऑपरेशन होत आहे. 

Updated: Aug 27, 2014, 05:08 PM IST
लालूंवर शस्त्रक्रिया, मोदींच्या शुभेच्छा

मुंबई : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर मुंबईत हृदय विकाराची शस्त्रक्रिया केली जात आहे. मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टीट्यूटमध्ये हे ऑपरेशन होत आहे. 

लालू यादव यांच्यावरील ही शस्त्रक्रिया सफल होईल, अशा शुभेच्छा देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. ह्दय विकाराच्या तक्रारीनंतर सोमवारी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

ट्वीट करून नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे, मी लालूंजींचं आरोग्य लवकर सुधारावं आणि त्यांना प्रकती लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करतो. या आधी लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीची कृषीमंत्री शरद पवार यांनी रूग्णालयात जाऊन विचारपूस केली. 

बिहारचे माजी मुख्यमंत्री नितिश कुमारही लालू यादव यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी मुंबईत येणार आहेत. लालू प्रसाद यादव यांचं वय आता 66 वर्ष आहे, ते 2004 ते 2009 दरम्यान रेल्वेमंत्रीही होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.