अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत गोंधळ, दिवस हक्कभंगाचा!

आज विधीमंडळ अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. मात्र हा दिवस गोंधळात सुरू आहे. शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांचा एकनाथ खडसेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडलाय. सावनेर तालुक्यातील वाळू उत्खननातील भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्याप्रकरणी आमदार गुलाबराव पाटील यांनी खडसेंविरुद्ध हा हक्कभंग आणलाय. 

Updated: Apr 10, 2015, 12:45 PM IST
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत गोंधळ, दिवस हक्कभंगाचा! title=

मुंबई: आज विधीमंडळ अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. मात्र हा दिवस गोंधळात सुरू आहे. शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांचा एकनाथ खडसेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडलाय. सावनेर तालुक्यातील वाळू उत्खननातील भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्याप्रकरणी आमदार गुलाबराव पाटील यांनी खडसेंविरुद्ध हा हक्कभंग आणलाय. 

उपविभागीय अधिकारी, तहसिलदार दोषी असल्याचं यात आढळून आलंय. त्यांना निलंबित करण्याची घोषणा केली खडसेंनी विधानसभेत केली होती. त्याला चार महिने झाले तरी निलंबनाची कारवाई झाली नाही. सभागृहात घोषणा करून कारवाई नाही हा सभागृहाचा अपमान असल्याचं म्हणत सत्ताधारी आमदारांनीच मंत्र्यांविरोधात हक्कभंग आणलाय. 

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणलाय.तापी-गोदावरी खोऱ्यातील पाणी प्रश्नी हा हक्कभंग आहे. आघाडी सरकारनं गुजरातला पाणी देण्याचा करार केल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याविरोधात आव्हाडांनी हक्कभंग प्रस्ताव मांडलाय. आघाडी सरकारनं असा कोणताही करार केलेला नाही, असं आव्हाडांनी विधानसभेत म्हटलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.