जोगेश्वरीमध्ये बिबट्याचा थरार

मुंबईतल्या जोगेश्वरी परिसरातल्या ओएनजीसी या नागरी वस्तीमध्ये घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनाधिका-यांना यश आलंय. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या या कॉलनीत शिरला होता.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 3, 2012, 08:03 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या जोगेश्वरी परिसरातल्या ओएनजीसी या नागरी वस्तीमध्ये घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनाधिका-यांना यश आलंय. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या या कॉलनीत शिरला होता.
तब्बल सहा तास बिबट्याने वनाधिका-यांना चकवा दिला. मात्र वनविभागाच्या कर्मचा-यांनी गुंगीचं औषध देऊन या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवलं. त्यानंतर बिबट्याला संजय गांधी उद्यानात नेण्यात आलं.
वनविभागाचे अधिकारी साडेतासानंतर घटनास्थळी पोहचले. त्यामुळं इथल्या नागरिकांना 6 तास दहशतीच्या वातावरणात रहावं लागलं. अखेर बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात यश आल्यानं परिसरातल्या नागरिकांचा जीव भांड्यात पडलाय.