एम इंडिकेटर लवकरच अपडेट होणार

मध्य रेल्वेच्या लोकस सेवेत वेळेच्या बाबतीत काही बदल करण्यात आले आहेत. यामुळे एम इंडिकेटर आणि मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांच्या वेळात तफावत दिसून येत होती, मात्र एम इंडिकेटर आता लवकरच अपडेट होणार आहे. आज सायंकाळपर्यंत एम इंडिकेरटर पूर्णपणे अपडेट होणार असल्याचं एम इंडिकेटरचा निर्माता सचिन टीकेने म्हटलं आहे.

Updated: Nov 18, 2014, 05:59 PM IST
एम इंडिकेटर लवकरच अपडेट होणार title=

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकस सेवेत वेळेच्या बाबतीत काही बदल करण्यात आले आहेत. यामुळे एम इंडिकेटर आणि मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांच्या वेळात तफावत दिसून येत होती, मात्र एम इंडिकेटर आता लवकरच अपडेट होणार आहे. आज सायंकाळपर्यंत एम इंडिकेरटर पूर्णपणे अपडेट होणार असल्याचं एम इंडिकेटरचा निर्माता सचिन टीकेने म्हटलं आहे.

गेले काही दिवस ऐन गर्दीच्यावेळी होणारे अपघात, तांत्रिक अडचणी आणि नवीन वेळापत्रकाची माहिती उपलब्ध नाही, अशा तिहेरी अडचणीत सध्या मध्य रेल्वेचे प्रवासी अडकले आहेत. यात मध्य रेल्वेसोबत मुंबईतील रेल्वे प्रवासाचा अविभाज्य भाग बनलेले 'एम इंडिकेटर' हे मोबाईल अॅपही टीकेचे धनी होत आहे. म्हणूनच प्रवाशांच्या तक्रारी आणि गैरसोयीची दखल घेत 'एम इंडिकेटर'वर रेल्वेचे नवे वेळापत्रक आज अपडेट होणार आहे.

सध्या ५५ लाख प्रवासी मोबाइलवरील 'एम इंडिकेटर'चा वापर करून रेल्वेच्या गाडय़ांची तसेच वाहतुकीबाबतची माहिती घेत असतात. 

मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक मुद्रित किंवा 'एम इंडिकेटर' स्वरूपात प्रवाशांपर्यंत पोहोचलेले नाही. मात्र त्याआधीच रेल्वेने या वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू केली आहे. गेली दोन वर्षे वेळापत्रकात फार बदल झाले नव्हते. 

यंदा मात्र, प्रत्येक गाडीची वेळ बदलल्याने प्रवाशांना 'आपली' गाडी आता नेमकी कधी येणार, याबाबत काहीच कल्पना नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये 'एम इंडिकेटर'बाबत नाराजी आहे. अॅप अपडेट झाल्यामुळे निदान गाड्यांच्या वेळापत्रकाची अडचण दूर होणार आहे.

कोणतेही वेगळे शुल्क न आकारता 'एम इंडिकेटर' आपल्याला मोबाइलमध्ये घेता येते. त्यासाठी गुगल प्ले-स्टोअरवर जाऊन ते डाऊनलोड करता येते. आता पश्चिम रेल्वे स्वत:हून ही यंत्रणा विकसित करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.