पेट्रोल डिझेल २ रुपयांनी महाग होणार

 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील करांमध्ये वाढ केली आहे. यात पेट्रोल-डिझेलवरील करात २ रुपयांनी वाढ केली आहे. तर सिगारेट, दारू, शीतपेय, हिरे आणि सोने यांच्यावरील करातही वाढ करण्यात आली आहे. 

Updated: Sep 30, 2015, 03:11 PM IST
पेट्रोल डिझेल २ रुपयांनी महाग होणार  title=

मुंबई :  दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील करांमध्ये वाढ केली आहे. यात पेट्रोल-डिझेलवरील करात २ रुपयांनी वाढ केली आहे. तर सिगारेट, दारू, शीतपेय, हिरे आणि सोने यांच्यावरील करातही वाढ करण्यात आली आहे. 

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. राज्य सरकारने एलबीटी आणि टोल रद्द केल्याने तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे तिजोरीवर बोजा पड़त आहे. त्यामुळे काही गोष्टींवरचा कर वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. 

सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलवर प्रतिलिटर २ रुपये कर वाढवणार आहे.  दारू, सिगरेट, वायु मिश्रित शीतपेयांवर ५ टक्के कर वाढवणार आहेत तर हिरे, सोने, त्यांचे दागिने महागणार आहेत. 

ग्रामीण भागातील पेट्रोल-डिझेल महागले
सरकारच्या दुष्काळग्रस्तांसाठी पेट्रोल-डिझेलवर प्रतिलीटर २ रूपये कर वाढविण्याचा निर्णयाचा फटका सर्वाधिक ग्रामीण जनतेला बसणार आहे. मोठ्या शहरातील पेट्रोल डिझेलवरील एलबीटी रद्द केल्याने मोठ्या शहरातील नागरिकांना पेट्रोल-डिझेलमध्ये ३ ते ४ रुपयांची सूट मिळणार होती. पण आता कर वाढल्याने त्यातील दोन रूपये वजा झाल्याने केवळे १ ते २ रुपयांचा दिलासा मिळणार आहे. 

ग्रामीण भागात एलबीटी नसल्याने ग्रामीण जनतेला पेट्रोल-डिझेलमधील करवाढीचा सरळ सरळ फटका बसणार आहे. 

पेट्रोल डिझेल वरील वाढीव कराला फामपेड़ाचा विरोध

दरम्यान, पेट्रोल डिझेल वरील वाढीव कराला फामपेड़ाचा विरोध असल्याचे फामपेड़ाचे अध्यक्ष उदय लोध यांनी रत्नागिरीत माहिती दिली. 

- वाढीव करामुळे सर्वसामान्याच्या खिशाला चाट बसणार

- इतर राज्यपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल महाग होणार

- राज्याच्या सीमेवर असणाऱ्या पेट्रोल पंपाना फटका बसणार

- लवकरात लवकर पंप चलकांची बैठक घेऊन आंदोलनाचा निर्णय घेणार

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.