मी राधे माँचा भक्त नाही, जानकरांचं स्पष्टीकरण

धनगर आरक्षणामुळे चर्चेत आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर राधे माँच्या दरबारात दिसले... आणि एकच गहजब उडाला... आता मात्र जानकरांनी 'मी नव्हे त्यातला' अशी भूमिका घेतलीय. 

Updated: Mar 8, 2016, 11:25 PM IST
मी राधे माँचा भक्त नाही, जानकरांचं स्पष्टीकरण title=

मुंबई : धनगर आरक्षणामुळे चर्चेत आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर राधे माँच्या दरबारात दिसले... आणि एकच गहजब उडाला... आता मात्र जानकरांनी 'मी नव्हे त्यातला' अशी भूमिका घेतलीय. 

जानकरांनी या चर्चा खोट्या असल्याचं म्हटलंय. मी राधे माँचा भक्त नाही, साताऱ्यातील गिरी महाराज आणि कार्यकर्ते यांच्या सोबत केवळ शुभेच्छा देण्यासाठी राधे माँकडे गेल्याचं स्पष्टीकरण महादेव जानकरांनी दिलंय.

तसेच आपल्या भीष्मप्रतिज्ञेसाठी परिचित असलेले  यांनी वादग्रस्त राधे माँच्या दरबारात हजेरी लावलीय. 

एका कार्यकर्त्यानं त्यांची ही राधे माँ सोबतची भेट घडवली आणि जानकरांचा फोटो व्हायरल झाला. राधे माँ काही महिन्यांपूर्वी लैंगिक शोषणासह इतर आरोपांमुळे वादग्रस्त ठरलीय.

लाल दिव्याची गाडी आपल्याला मिळत नाही, फडणवीस सरकार आपल्यावर फिदा होत नाहीत म्हणून नाऊमेद असलेल्या जानकरांनी राधे माँला साकडं घातलं अशी चर्चा मीडियात आहे.