मेट्रो शहरांसाठी महाबजेटमध्ये काय? पाहा...

मुंबई, पुणे, नागपूर या मेट्रो शहरांसाठीही आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प 2017-18 मध्ये काही महत्त्वाच्या तरतूदी जाहीर केल्या.

Updated: Mar 18, 2017, 05:14 PM IST
मेट्रो शहरांसाठी महाबजेटमध्ये काय? पाहा...  title=

मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर या मेट्रो शहरांसाठीही आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प 2017-18 मध्ये काही महत्त्वाच्या तरतूदी जाहीर केल्या.

शहरांच्या विकासासाठी... 

- मुंबई, पुणे व नागपूर येथील मेट्रो प्रकल्पांसाठी एकत्रित 710 कोटी रुपयांच्या भरघोस निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलीय

- मुंबई महानगर क्षेत्रात हाती घेण्यात आलेल्या शिवडी न्हवाशिवा, नवी मुंबई विमानतळ, नवी मुंबई मेट्रो हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी म्हटलंय

- पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 'महाइन्फ्रा' नावाची हेतूवहन संस्था स्थापन केली जाईल, अशी घोषणाही मुनगंटीवार यांनी आज केली

- राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातंर्गत 50 हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 211 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलीय

- तसंच महाराष्ट्रात कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी कार्ड स्वाईप मशीनवरील 13.5 %चा कर संपूर्णत: माफ करण्यात आलाय