मंत्रीमंडळ विस्तार, भाजपची लिस्ट बदलण्याची शक्यता

राज्यमंत्री मंडळात विस्ताराचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. भाजपाची पहिली नावे जाहीर झाली होती. त्यातील एक नाव बदलण्यात आल्याने काही भाजप कार्यकर्ते खूश झाले तर काही नाराज झाले आहे. 

Updated: Jul 7, 2016, 06:18 PM IST
मंत्रीमंडळ विस्तार, भाजपची लिस्ट बदलण्याची शक्यता title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यमंत्री मंडळात विस्ताराचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. भाजपाची पहिली नावे जाहीर झाली होती. त्यातील एक नाव जोडण्यात आले आहे. त्यामुळे सस्पेन्स अजून कायम आहे. 

सुरूवातीची यादी...

सुरूवातीला भाजपमधल्या मंत्रिपदाच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. पांडुरंग फुंडकर, सुभाष देशमुख, जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर, मदन येरावार आणि शिवाजीराव नाईक यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले होते. 

कोणाची नावे निश्चित... 

यातील फुंडकर, देशमुख, रावल, निलंगेकर, येरावार यांना मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतले होते. त्यामुळे त्यांची नावे निश्चित आहेत. पण शेवटच्या नावासाठी शिवाजीराव नाईक आणि डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.   

मित्रपक्षांची नावे ठरली

दरम्यान, मित्रपक्षा कडून महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांची मंत्रिपदं निश्चित करण्यात आली आहे.. 

नेहमी राजभवनात होणारा शपथविधीचा कार्यक्रम यंदा विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे.