महाराष्ट्र सदन प्रकार : CM ना आधिच माहिती, मग गप्प का?

महाराष्ट्र सदनात घडलेल्या रोजा रोटीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. शिवसेनेच्या खासदारांकडून ज्या दिवशी हा प्रकार घडला त्याच दिवशी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला गुप्त अहवालाद्वारे माहिती दिली होती. मात्र सहा दिवस उलटल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणाची दखल घेतली नसल्याचं उघड झालंय.

Updated: Jul 29, 2014, 03:35 PM IST
महाराष्ट्र सदन प्रकार : CM ना आधिच माहिती, मग गप्प का? title=

मुंबई : महाराष्ट्र सदनात घडलेल्या रोजा रोटीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. शिवसेनेच्या खासदारांकडून ज्या दिवशी हा प्रकार घडला त्याच दिवशी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला गुप्त अहवालाद्वारे माहिती दिली होती. मात्र सहा दिवस उलटल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणाची दखल घेतली नसल्याचं उघड झालंय.

मुख्यमंत्र्यांनी नेमकी यासंदर्भात का दखल घेतली नाही याबाबत सवाल उपस्थित होऊ लागलाय. मुख्यमंत्र्यांनी वेळीच दखल घेतली असती तर हे प्रकरण वाढलं नसतं. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण का नाही दिलं नाही अशीही विचारणा आता होऊ लागलीय. 

महाराष्ट्र सदनातील कॅन्टिनमधल्या केटरिंग सुपरवायजरला रोजा दरम्यान 17 जुलैलला शिवसेनेच्या खासदारांनी रोटी खाऊ घालण्याचं प्रकरण घडलं होतं. या घडलेल्या प्रकाराची माहिती 17 जुलैलाच सीएमओला कळवण्यात आली होती. निवासी आयुक्त बिपीन मलिकांनी गुप्त अहवालाद्वारे ही माहिती सीएमओला दिली होती. मग असं असतानाही मुख्यमंत्र्यांनी सहा दिवस यासंदर्भात दखल का घेतली नाही, असा सवाल उपस्थित होतोय. मुख्यमंत्र्यांनी वेळीच दखल घेतली असती तर हे प्रकरण वाढलं नसतं. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण का नाही दिलं नाही असा सवाल उपस्थित होतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.