लक्ष द्या: दहावीच्या निकालाची खरी खुरी तारीख जाहीर

अनेक दिवसांपासून दहावीच्या निकालाची तारीख काय याबद्दल अनेक वेगवेगळ्या बातम्या प्रसारीत होत होत्या. मात्र आता दहावीच्य़ा निकालाची तारीख जाहीर झाली आहे.

| Updated: Jun 13, 2014, 10:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अनेक दिवसांपासून दहावीच्या निकालाची तारीख काय याबद्दल अनेक वेगवेगळ्या बातम्या प्रसारीत होत होत्या. मात्र आता दहावीच्य़ा निकालाची तारीख जाहीर झाली आहे. शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी ही माहिती दिलीय.
मंगळवार, दिनांक 17 जून रोजी वेबसाईटवरून दहावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात शालान्त विभागाच्या म्हणजेच दहावीच्या परिक्षा घेण्यात आल्य़ा होत्या.
मंगळवार, दिनांक 17 जून रोजी दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थी वेबसाइटवर आपला निकाल पाहू शकतील. तर, २७ जूनला दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या शाळांमध्ये गुणपत्रिका मिळेल, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी दिली.
हा निकाल ` बेस्ट ऑफ फाइव्ह ` च्या सूत्रानुसारच लागणार आहे. बारावीचा निकाल बोर्डानं तडकाफडकी जाहीर केल्यानंतर, दहावी निकालाच्या तारखेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
शुक्रवारी, १७ जूनला दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना सात वेबसाइटवरून आपला निकाल पाहता येईल. शिवाय बीएसएनएलच्या मोबाइलवरूनही विद्यार्थ्यांना आपला निकाल एसएमएसद्वारे मिळवता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी MHSSC (space) Seat No. टाईप करून ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस केल्यास एक रुपयांत त्यांना आपला निकाल उपलब्ध होऊ शकेल.
विद्यार्थ्यांना आपला निकाल पुढील वेबसाईट पाहता येईल
www.msbshse.ac.in
www.mh-ssc.ac.in
www.maharashtratimes.com
www.studyssconline.com
www.myssc.in/sscresult
 sscresult.mkcl.org

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.