उत्पादन शुल्क विभागात लिपिक – टंकलेखक पदाची भरती

महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने लिपिक – टंकलेखक पदाच्या रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. रिक्त ५८ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 24, 2013, 08:51 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने लिपिक – टंकलेखक पदाच्या रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. रिक्त ५८ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी २४ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०१३ आहे. तर संगणकीय चलनाद्वारे शुल्क भरण्याचा कालावधी २४ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०१३ आहे. ज्यांचे अर्ज दिनांक ७ नोव्हेंबर रोजी दाखल झाले आहेत व ज्या उमेदवारांनी बँकेमध्ये ८ नोव्हेंबरपर्यंत भरती प्रक्रिया शुल्क जमा केले असेल त्यांच्यासाठी उरलेला ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम कालावधी ११ नोव्हेंबर २०१३ आहे. अधिक माहिती MKCL या संकेतस्थळाच्या http://oasis.mkcl.org/excise2013 साईटवर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.