राज्यातील विद्यापीठांना दर्जा सुधारण्यासाठी श्वेतपत्रिकेचे आदेश

राज्यातल्या विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यासाठी विद्यापीठांनी श्वेतपत्रिका काढावी, असे आदेश राज्यपाल आणि राज्यातल्या विद्यापीठांचे कुलपती विद्यासागर राव यांनी दिले आहेत. 

Updated: Sep 1, 2015, 11:21 PM IST
राज्यातील विद्यापीठांना दर्जा सुधारण्यासाठी श्वेतपत्रिकेचे आदेश title=

मुंबई : राज्यातल्या विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यासाठी विद्यापीठांनी श्वेतपत्रिका काढावी, असे आदेश राज्यपाल आणि राज्यातल्या विद्यापीठांचे कुलपती विद्यासागर राव यांनी दिले आहेत. 

राज्यातल्या विद्यापीठांच्या कुलगुरूंची मुंबईत नुकतीच बैठक झाली त्यात त्यांनी हे आदेश दिले आहेत. श्वेतपत्रिकेच्या निमित्ताने विद्यापीठातल्या समस्या मांडण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सर्व विद्यापीठातल्या सोयीसुविधा तसंच शिक्षक विद्यार्थी शिक्षक प्रमाण याबाबत श्वेतपत्रिका काढून माहिती देण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. 

शिक्षकांची मंजूर पदं आणि शिक्षकांची नियुक्ती यात तफावत आहे का याबाबत महत्त्वाची माहिती श्वेतपत्रिकेत स्पष्ट होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.