धावत्या लोकलमध्ये चढताना व्यक्तीचा मृत्यू

धावत्या एक्सप्रेसमधून उतरताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच दादरच्या प्लॅटफॉर्मवर अशीच एक घटना घडलीये. धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात एका ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झालाय. 

Updated: Jan 31, 2016, 12:44 PM IST
धावत्या लोकलमध्ये चढताना व्यक्तीचा मृत्यू title=

मुंबई : धावत्या एक्सप्रेसमधून उतरताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच दादरच्या प्लॅटफॉर्मवर अशीच एक घटना घडलीये. धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात एका ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झालाय. 

शफीउद्दीन अब्दुल गनी शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दादर स्थानकात पोहोचले. प्लॅटफॉर्मवरुन उतरत असतानाच लोकल आल्याचे त्यांनी पाहिले. सामानासह खाली उतरताच लोकल सुरु झाली. त्यांनी तातडीने आपली पत्नी आणि मुलाल ट्रेनमध्ये चढवले. 

त्यानंतर बॅग चढवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान ट्रेनने वेग घेतला होता. शफीउद्दीन यांनी ट्रेनमध्ये जसा चढण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडला होता. यादरम्यान बॅलन्स सांभाळता न आल्याने ते खाली पडले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.