‘आरएसएसनं वापरला चोरीचा पैसा’

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, October 25, 2012 - 21:56

www.24taas.com, मुंबई
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी आणि आरएसएसवर घणाघाती आरोप केले आहेत. गडकरी सार्वजनिक बांधकाममंत्री असताना नागपुरातल्या आरएएसच्या कार्यालयाचे बांधकाम झाले आहे. त्यामुळं यासाठी आलेला पैसा हा संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
या बांधकामासाठी आलेल्या पैशांबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केलीय. जातीयवादी संघ आता भ्रष्टाचारालाही खतपाणी घालत असल्याचा आरोपही माणिकरावांनी यवतमाळमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलाय. गडकरी पूर्तीच्या ग्रुपच्या गुंतवणुकीवरून यापूर्वीच अडचणीत आले आहेत. आता माणिकरावांनी संघ कार्यलयाच्या बांधकामाच्या पैशांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय.
तसंच गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना हे कार्यलय बांधलं गेल्यानं गडकरींनीच पैसा पुरवला आहे का असाही रोख माणिकरावांचा या आरोपांमागे आहे. त्यामुळं गडकरींसमोरील अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

First Published: Thursday, October 25, 2012 - 21:38
comments powered by Disqus