अशोकराव मोठे नेते, त्यांनी करून दाखवलं- माणिकराव

नांदेड वाघाळा महापालिकेत अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलीये. 32 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.

Updated: Oct 15, 2012, 01:05 PM IST

www.24taas.com, मुंबई
नांदेड वाघाळा महापालिकेत अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलीये. 32 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. `अशोक चव्हाण हे फार महाराष्ट्रातील फार मोठे नेते आहेत. त्यांनी केलेलं कामही चागंल असल्याने त्यांना नांदेडच्या मतदारराजांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे. अशोकरावांच्या नेतृत्वावर विश्वास नादेंडवासियांना दाखवला आहे`. तर काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण यांना महत्त्वाचं स्थान आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी `झी २४ तास`शी बोलताना दिली.
निकालात काँग्रेसनं आघाडी घेतलीय... काँग्रेसनं 2 जागा जिंकल्यायेत तर शिवसेनेनंही खातं उघडलय. विशेष म्हणजे काँग्रेसच्या एका उमेदवाराची यापूर्वीच बिनविरोध निवड झालीय. नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतन इथं ही मतमोजणी होतेय.
आठ निवडणूक निर्णय अधिका-यांच्या अंतर्गत असलेल्या सर्व प्रभागांची एकाचवेळी मतमोजणी होतेय. एकूण 86 टेबलांवर एकाचवेळी ही मतमोजणी सुरु आहे. दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.