राज्यात पावसाचं आगमन, मुंबई-पुण्यात बरसल्या जलधारा

पुणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. येत्या ४८ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

Updated: Jun 8, 2015, 10:54 AM IST
राज्यात पावसाचं आगमन, मुंबई-पुण्यात बरसल्या जलधारा title=

 

शिर्डी :  शिर्डीसह उत्तर नगर जिल्हयात मुसळधार पावसाच आगमन झाले. राहाता, शिर्डी, संगमनेर, कोपरगाव तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी पावसाची दमदार सुरूवात झाली. शेतकरी राजाला दिलासा मिळाला आहे. 

बुलढाणा - मोताला तालुक्यातील गोतमारा येथे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान चरायला गेलेल्या बकऱ्या पावसामुळे अांब्याच्या झाडाखाली थांबल्या असताना आंब्याचे मोठे झाड़ अचानक कोसळले. त्या झाडाखाली 25 बकऱ्या दबून मरण पावल्याची घटना आता घडली.

लातूर : जळकोट तालुक्यात वीज पडून दोन शेतकरी ठार झाले, हळद वाढवना येथे वीज पडून महादु सटवाजी नामवाड (55) तर सुनोळा येथील अमोल अप्पाराव नागरगोजे (28) हे दोन शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. 

रत्नागिरी: कोकणातही पावसाची हजेरी.. गुहागरला वादळी-वाऱ्याचा तडाखा... तळीवर पेट्रोलपंपाती शेड कोसळली... मुंबईत सायन, शेवरी इथंही पाऊस...

दरम्यान, राज्यात २४ तासांत मान्सूनपूर्व पाऊस पडेल. कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. 

मुंबई/पुणे: पुणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. येत्या ४८ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. तसंच मराठवाड्यातही पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.. त्यामुळं उकाड्यामुळं त्रस्त नागरिक आणि बळीराजाला दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.

अनेक पर्यटक पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटनस्थळी पोहोचलेत. लोणावळ्याला आज पहिल्या पावसाची पर्यटकांनी मज्जा लूटलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.