मराठा मोर्चा ९ ऑगस्टला मुंबईत

मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या समस्यांसाठी मुंबईत 9 ऑगस्टला मूक मोर्चा काढणार असल्याचं, मराठा क्रांती मोर्चा संघटनेनं जाहीर केलंय.

Updated: May 24, 2017, 06:30 PM IST
मराठा मोर्चा ९ ऑगस्टला मुंबईत  title=

मुंबई : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या समस्यांसाठी मुंबईत 9 ऑगस्टला मूक मोर्चा काढणार असल्याचं, मराठा क्रांती मोर्चा संघटनेनं जाहीर केलंय. महाराष्ट्रात आतापर्यंत निघालेल्या मराठा मूक मोर्चांच्या तुलनेत हा मोर्चा महाभव्य असेल असा दावा संघटनेनं केलाय.

जून महिन्यापासूनच या मोर्चासाठी तयारी सुरु केली जाणार आहे. तर मोर्चा झाल्यानंतर १३ ऑगस्टला मराठा मोर्चाबाबत आढावा बैठक घेतली जाणार आहे. त्यापूर्वी ६ जूनला शिवराज्याभिषेकानिमित्त रायगडावर शपथ घेऊन राज्यभर महामोर्चा आणि मराठा समस्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे. तर कोपर्डी इथे १३ जुलैला पीडितेला श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.

कोपर्डी बलात्कार घटनेनंतर पहिला मराठा मूक मोर्चा गेल्यावर्षी ९ ऑगस्टलाच काढण्यात आला होता. दरम्यान सरकासरशी चर्चा करण्यासाठी समितीची स्थापना केली असून ही समिती सरकारशी यापूढे बोलणी करणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.

मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांनाही ओबीसी समाजाप्रमाणे शिक्षणात सवलती मिळाव्यात यासाठी यापुढल्या काळात पाठपुरावा करणार असल्याचंही संघटनेनं सांगितलंय.