मराठा, मुस्लिम आरक्षणाचा मार्ग मोकळा

मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असल्याचं सांगण्यात येत आहे, कारण मंत्रिमंडळाने घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयावर राज्यपालांनी स्वाक्षरी करून वटहुकूम जारी केला आहे.

Updated: Jul 9, 2014, 07:34 PM IST
मराठा, मुस्लिम आरक्षणाचा मार्ग मोकळा title=

मुंबई : मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असल्याचं सांगण्यात येत आहे, कारण मंत्रिमंडळाने घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयावर राज्यपालांनी स्वाक्षरी करून वटहुकूम जारी केला आहे.

मंत्रिमंडळाने मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, या निर्णयावर राज्यपालांनी आज स्वाक्षरी केली आहे. 

या आरक्षणाला सर्व पक्षांनी पाठिंबा दिलाय, तसेच विरोधकांनीही आपण मराठा आरक्षणाच्या विरोधात नसल्याचं म्हटलं आहे.

मात्र केतन तिरोडकर यांनी मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. याविरोधात मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईही फेकली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.