म्हाडाच्या १०६३ घरांची सोडत जाहीर, विजेत्यांचं अभिनंदन

मुंबईत म्हाडाच्या विविध भागांतल्या १०६३ घरांसाठी  सोडत जाहीर झाली आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, खासदार पूनम महाजन आणि आमदार आशिष शेलार हे यावेळी सोडतीला उपस्थित होते.

Updated: May 31, 2015, 04:49 PM IST
म्हाडाच्या १०६३ घरांची सोडत जाहीर, विजेत्यांचं अभिनंदन title=

मुंबई: मुंबईत म्हाडाच्या विविध भागांतल्या १०६३ घरांसाठी  सोडत जाहीर झाली आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, खासदार पूनम महाजन आणि आमदार आशिष शेलार हे यावेळी सोडतीला उपस्थित होते.

लाभार्थ्यांचं अभिनंदन करत इथून पुढे जास्तीत जास्त अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी घरं बनवणार असल्याचा मानस प्रकाश मेहतांनी व्यक्त केला. येत्या काही वर्षांत ६७ हजार घरं बनवणार असून त्यांची सोडत डिसेंबरपर्यंत होईल असंही ते म्हणाले. 

विरारमध्ये MMR एरियात ही ११ लाख घरं बांधण्यात येणार आहेत. १ लाख ४० हजार गिरणी कामगारांपैकी २५ हजार घरं मुंबईत तर उर्वरीत गिरणी कामगारांना MMR एरियात घरं देणार असल्याचं ते म्हणालेत. 

'टाईमपास' चित्रपट फेम दगडू प्रथमेश परब याला सायन प्रतिक्षानगरला कलाकार यादीत म्हाडाचं घर लागलंय. तर विशाखा सुभेदारला मुलुंडला घर लागलं. तर अमरावतीचे मेळघाटचे भाजपचे आमदार प्रभूदास भिलाणेकर यांनाही मुलुंडमध्ये घर लागलं. 

लॉटरीतील विजेते नाव पाहा -

https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/M15/draw/M15.html

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.