म्हाडाच्या 972 घरांसाठी सोडत जाहीर

म्हाडाच्या मुंबईतील 972 घरांची सोडत आज निघणार आहे. मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं अशा सगळ्यांच्या नजरा आजच्या तारखेकडे लागल्या होत्या. 

Updated: Aug 10, 2016, 03:06 PM IST
म्हाडाच्या 972 घरांसाठी सोडत जाहीर title=

मुंबई : म्हाडाच्या मुंबईतील 972 घरांची सोडत आज निघणार आहे. मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं अशा सगळ्यांच्या नजरा आजच्या तारखेकडे लागल्या होत्या. 

म्हाडाची सोडत LIVE पाहण्यासाठी क्लिक करा

सकाळी नऊ वाजल्यापासून वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात लॉटरीची सोडत काढण्यात येत आहे. ही लॉटरीची सोडत बोरिवली, दहिसर, गोरेगाव, मालाड, मानखुर्द, चेंबूर, कुर्ला आणि पवई इथल्या घरांसाठी आहे. 

म्हाडाच्या या 972 घरांसाठी 1 लाख 36 हजार 577 अर्ज आलेत. त्यामुळं यापैकी कोणत्या भाग्यवंतांना घराची लॉटरी लागणार याची उत्सुकता लागलीय.. 

म्हाडाच्या वतीने रंगशारदा सभागृहात आणि सभागृहाबाहेर विशेष व्यवस्था करण्यात आलीय. तसंच या सोडतीचा ऑनलाईन निकाल संध्याकाळी 6 वाजता म्हाडाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.