म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज लॉटरी

म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज लॉटरी निघणार आहे. मुंबईलगतच विरार-बोळींज, मीरा रोड, ठाण्यात कावेसर, बाळकुम आणि कोकणात वेंगुर्ल्यामध्ये या सदनिका आहेत. 

Updated: Feb 24, 2016, 10:43 AM IST
म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज लॉटरी title=

मुंबई : म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज लॉटरी निघणार आहे. मुंबईलगतच विरार-बोळींज, मीरा रोड, ठाण्यात कावेसर, बाळकुम आणि कोकणात वेंगुर्ल्यामध्ये या सदनिका आहेत. 

आज सकाळी १० वाजता कॉम्प्युटराईज पद्धतीनं ही सोडत काढण्यात येईल. वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात ही सोडत निघेल. या सोडतीसाठी तब्बल १ लाख ३४ हजार १२४ अर्ज दाखल झालेत. यातल्या केवळ सुमारे सव्वाचार हजार लोकांचंच घराचं स्वप्न साकार होणार आहे. 

म्हाडाची सो़डत झालेली यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निकाल पाहण्यासाठी अर्जदार स्वतः सभागृहात किंवा सभागृहाबाहेर घातलेल्या मंडपात येऊ शकतात. या अर्जदारांना प्रवेशिका देण्यासाठी सभागृहातच सकाळी ७ ते ९ या वेळेत व्यवस्था करण्यात आलीये. तसंच सोडतीचा निकाल संध्याकाळी ६ वाजता "लॉटरी डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन" या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.