म्हणून मनसेचा गुढी पाडवा मेळावा होणार नाही

मनसेचा यंदाचा गुढी पाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वैयक्तिक कारणामुळे परदेशात जाणार आहेत.

Updated: Mar 20, 2017, 04:03 PM IST
म्हणून मनसेचा गुढी पाडवा मेळावा होणार नाही

मुंबई : मनसेचा यंदाचा गुढी पाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वैयक्तिक कारणामुळे परदेशात जाणार आहेत. यामुळे त्यांना मेळाव्यात सहभागी होणं शक्य नसल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. 

गुढी पाडवा मेळावा रद्द करण्यात आला असला तरी स्थानिक पातळीवर पाडवा जल्लोषात साजरा करण्याच्या सूचना राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.