मुंबई महापौर निवडीबाबत मनसेनेने केली भूमिका जाहीर

महापालिकेत शिवसेनेचा की भाजपचा महापौर बसणार याकडे लक्ष लागले आहे. यात सर्वात महत्वाची भूमिका ही आता मनसेची असणार आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. आता मनसेनेने आपले मौन सोडले आहे. त्यामुळे आता अधिकच रंगत आलेय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 3, 2017, 11:55 PM IST
मुंबई महापौर निवडीबाबत मनसेनेने केली भूमिका जाहीर title=

मुंबई : महापालिकेत शिवसेनेचा की भाजपचा महापौर बसणार याकडे लक्ष लागले आहे. यात सर्वात महत्वाची भूमिका ही आता मनसेची असणार आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. आता मनसेनेने आपले मौन सोडले आहे. त्यामुळे आता अधिकच रंगत आलेय. 

मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीबाबत मनसेची भूमिका जाहीर करण्यात आली आहे. आम्हाला कोणी गृहीत धरू नये.आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत, असे सांगत पालिकेच्या सत्तेबाबत अधिकच चुरस वाढली आहे. मुंबईचा महापौर मराठी असावा, अशी अट माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 8 मार्चला काय होणार याची उत्सुकता लागली आहे.

काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. तर राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, काँग्रेसने आघाडी करुन आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडे केली आहे. महापौर निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस यांचे उमेदवार असणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. 

तर अपक्षांना खेचण्यासाठी शिवसेना - भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेने दोन अपक्ष आपल्या गळाला लावले. तर भाजपने अभासे नगरसेविका गीता गवळी यांच्यावर दबाव आणून आपल्याकडे खेचून आणली. त्यामुळे मनसेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आता मनसेने आपली भूमिका स्पष्ट केल्याने अधिक रंगत आली आहे आणि अनिश्चितता कायम आहे.