शालिनी ठाकरेंनी पाठविली आबांना बांगड्यांची भेट!

राज ठाकरेंच्या आवाहनाला लगेचच प्रतिसाद देत मनसेच्या कार्यकर्त्यांना आबांना खरोखरच बांगड्या धाडल्यात. या मनसे महिला सेनेचं नेतृत्व करत होत्या शालिनी ठाकरे...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 11, 2013, 11:14 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करत आपल्या महिला पदाधिकाऱ्यांना आबांना बांगड्या धाडण्याची आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला लगेचच प्रतिसाद देत मनसेच्या कार्यकर्त्यांना आबांना खरोखरच बांगड्या धाडल्यात. या मनसे महिला सेनेचं नेतृत्व करत होत्या शालिनी ठाकरे...
‘मुंबईसारख्या शहरात एका महिला पत्रकारासोबत सामूहिक बलात्काराची घटना घडते... हे केवळ लज्जास्पद आहे... वर्षानुवर्ष अशा घटना घडतच आल्यात... गेल्या वर्षी आझाद मैदानातील मोर्चा दरम्यान महिला पोलिसांची विटंबना करण्यात आली होती.... त्यांच्यावरदेखील अन्याय झाला होता... त्यावेळीही आम्ही गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांना या पदावर बसण्याचा अधिकार नाही... महिला स्वत:ला सुरक्षित समजत असतील तर गृहमंत्र्यांना राज्य करण्याचा नव्हे तर केवळ बांगड्या घालण्याचा अधिकार आहे’ असं यावेळी शालिनी ठाकरे यांनी म्हटलंय.

‘राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील असून राज्यातील महिला भगिनींनी एका बॉक्समध्ये बांगड्या भरून त्यांना पाठवाव्यात... जेवढे जास्त बॉक्स जातील तेवढी लाज वाटून तरी ते राजीनामा देतील’ असा सणसणीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आबांना लगावला होता.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.