मनसेची नेपाळसाठी मदतीची दुसरी कुमक रवाना

नेपाळमधल्या भूकंपग्रस्तांना औषधाच्या मदतीची दुसरी कुमक मनसेनं रवाना केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही मदत पाठवण्यात आली. 

Updated: May 2, 2015, 10:45 AM IST
मनसेची नेपाळसाठी मदतीची दुसरी कुमक रवाना title=

मुंबई : नेपाळमधल्या भूकंपग्रस्तांना औषधाच्या मदतीची दुसरी कुमक मनसेनं रवाना केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही मदत पाठवण्यात आली. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज इथे गोरखा ग्रुप ट्रस्टच्या सदस्यांना ही मदत सुपूर्द करण्यात आली. मातोश्री सेवा ट्रस्टचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी याआधी ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांच्या मदतीनं शॉन खंबाटा फाऊंडेशनकडे नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी औषधाची पहिली कुमक पाठवली होती. 

त्यानंतर मदत आणि बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या एनडीअआरएफ आणि दिल्लीतील नेपाळच्या दूतावासानं आणखी औषधांची मागणी केली होती. त्यानुसार ही मदत पाठविण्यात आलीय. मुस्लीम समाजानंही या मदत कार्यात आपला सहभाग दाखविल्याबद्दल मनोज चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.