आज लाकडं ठेवतायेत उद्या बॉम्ब ठेवतील- मनसे

मुंबई महानगरपालिकेच्या अख्यारित असणाऱ्या स्मशानभूमीत सुरू असलेल्या भष्ट्राचारावर मनसेनेही चागंलेच आसूड ओढले आहेत.

Updated: Mar 26, 2013, 06:14 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईत होळीसाठी लागणारी लाकडं ही स्मशानातून आणली जातात. आणि ही लाकडं विकत आणली जातात. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अख्यारित असणाऱ्या स्मशानभूमीत सुरू असलेल्या भष्ट्राचारावर मनसेनेही चागंलेच आसूड ओढले आहेत.
`आज कंत्राटदाराने जास्तीची लाकडं ठेवली आहेत. उद्या बॉम्ब ठेवेल` . मनसे नगरसेवक संदीप देशपांडे प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात साटंलोट असल्याशिवाय अशाप्रकारची गोष्ट होणं शक्य नाही.` असं म्हणत त्यांनी प्रशासनालाच यासाठी जबाबदार धरले आहे. `मुंबई महापालिकेत अधिकारी असणार यात शंकाच नाही. अशा लोकांवर कारवाई झालीच पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून त्यांच्यावर कारावाई होण्यासाठी आम्ही आवाज उठवणार. त्यांच्या संगमताशिवाय हे होणं शक्य नाही.`

`ठेकेदारावर महापालिकेने लक्ष ठेवले पाहिजे. आज कंत्राटदाराने लाकडं ठेवली होती उद्या बॉम्ब ठेवतील, यावर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे आणि जर लक्ष नाही ठेवलं तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.` `हे सगळं ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात गौडबंगाल आहे त्यामुळे हे सुरू आहे. याविरोधात मनसे नक्कीच आवाज उठवेल.`