तन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाही - मनसे

आयबीच्या तन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाहीत, तसेच तन्मय विरोधात पोलिसांत तक्रार करण्याची तयारी सुरू असल्याचंही मनसेने म्हटले आहे.

Updated: May 30, 2016, 12:58 PM IST
तन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाही - मनसे title=

मुंबई : एआयबीच्या तन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाहीत, तसेच तन्मय विरोधात पोलिसांत तक्रार करण्याची तयारी सुरू असल्याचंही मनसेने म्हटले आहे. 
भारतरत्न लता मंगेशकर तसेच सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात अश्लील आणि खालच्या पातळीचे विनोद केल्याने, तन्मय भट्टला सर्वांकडून खडे बोल सुनावले जात आहेत.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटलंय, 'भारताच्या अशा दिग्गज ज्यांचा आम्हाला अभिमान आहे, अशा व्यक्तींवर तन्मयने खूप खालच्या पातळीचे विनोद करून त्यांचा अपमान केला आहे. 

आम्ही शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तन्मयविरुद्ध तक्रार करणार आहोत. अशा लोकांना कधीच माफ केले जाऊ शकत नाही आणि तन्मय भट्ट रस्त्यावर दिसल्यास त्याला त्याच्या कृत्याचा परिणाम दिसेल'.