सेनेचे ‘नया है वह’, तर मनसेचे ‘सोया है यह’

मनसेने टोलविरोधात केलेले आंदोलन केवळ पाच तासांत आटोपले या आंदोलनावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये ‘नया है वह’ म्हणून अग्रलेख लिहण्यात आला. या अग्रलेखाला उत्तर देण्यासाठी मनसेकडे कोणतेही वृत्तपत्र नाही. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत फेसबुक, वॉट्सअप, ट्विटरवर एक मेसेज टाकला आहे.

Updated: Feb 17, 2014, 11:03 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसेने टोलविरोधात केलेले आंदोलन केवळ पाच तासांत आटोपले या आंदोलनावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये ‘नया है वह’ म्हणून अग्रलेख लिहण्यात आला. या अग्रलेखाला उत्तर देण्यासाठी मनसेकडे कोणतेही वृत्तपत्र नाही. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत फेसबुक, वॉट्सअप, ट्विटरवर एक मेसेज टाकला आहे.
हा मेसेज फारच धुमाकूळ घालतो आहे. शिवसेनेच्या नया है वह या अग्रलेखाला मनसेने ‘सोया है यह’ने उत्तर दिले आहे.
काय आहे तो मेसेज
नया है वह...? सोया है यह.......!!!!
एक आंदोलन आणि मुंबई व महाराष्ट्रातल्या सगळ्या आस्थापनावरच्या पाट्या मराठीत… - नया है वह???
आजाद मैदानात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात ठामपणे उभा राहून पोलिसांची बाजू घेणारा एकमेव नेता…. - नया है वह???
मतांची लाचारी न करता मराठी अस्मिता जपणारा एकमेव नेता …. - नया है वह???
मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्स मध्ये मानाचे स्थान मिळवून देणारा… -नया है वह???
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारानेता…- नया है वह???
३ वर्षात १३ आमदार निवडून आणणारा नेता …. - नया है वह???
महाराष्ट्राच्या हितासाठी 100+ पोलिस केसेस अंगावर घेणारा नेता… - नया है वह???
राज्यातील सक्षम विरोधी पक्ष म्हणून सरकारवर अंकुश ठेवणाऱ्या पक्षाचा नेता… - नया है वह???
टोलच्या भ्रष्टाचाराला वाचा फोडून २०१२ साली ६५ टोलनाके, यावर्षी आत्ता ३, १० करोडच्या आत बी.ओ.टी.वर असणारे २२ (जवळ जवळ ९० च्यावर टोलनाके बंद) टोलनाके बंद करणारा नेता… - नया है वह???
आता तुम्हीच ठरवा `नया` है कौन आणि `सोया` है कौन…………?

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.