मॉडेलचा डॉक्टरवर लैंगिक शोषणाचा आरोप, केली दगडफेक!

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, November 10, 2013 - 14:32

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील अंधेरी येथे शिखा जोशी नामक होतकरू मॉडेलने एका कॉस्मेटिक सर्जनच्या घरावर दगडफेक केली होती. ३० ऑक्टोबर रोजी तिने आणि तिच्या भावाने सर्जनच्या घरावर दगडफेक केल्याबद्दल पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
काही वर्षांपूर्वी शिखा जोशी ही मॉडेल विजय शर्मा नामक कॉस्मेटिक सर्जन यांच्याकडे सौंदर्यवृद्धीसाठी उपचार घेत होती. त्यावेळी डॉ. विजय शर्मा यांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप शिखाने केला. यासंदर्भात तिने तक्रारही केली होती. मात्र डॉ. विजय शर्मा यांना कुठलीच शिक्षा झाली नाही, याबद्दल तिला राग आला होता. ३० ऑक्टोबरला ती डॉ. विजय शर्मा यांच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती होण्यास गेली, त्यावेळी डॉ. शर्मांनी तिला भर्ती करून घेण्यास नकार दिला.
यासंदर्भात बोलण्यासाठी शिखा आपल्या भावासोबत डॉ. विजय शर्मांच्या घरी गेली. तेथे डॉ. शर्माशी त्यांनी भांडण केलं. मात्र डॉ. शर्मांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने बाहेर पडल्यावर शिखा जोशी आणि तिच्या भावाने त्यांच्या घरावर शिवीगाळ करत दगडफेक केली. याबद्दल शिखा आणि तिच्या भावाला अटक करण्यात आलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, November 10, 2013 - 14:32
comments powered by Disqus