राज ठाकरेंची सरसंघचालकांनी घेतली भेट

सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. बाळासाहेब यांच्या निधनानंतर राज यांचे त्यांनी सांत्वन केले.

सुरेंद्र गांगण | Updated: Nov 21, 2012, 06:48 PM IST

www.24taas.com, मुंबई
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. बाळासाहेब यांच्या निधनानंतर राज यांचे त्यांनी सांत्वन केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मोहन भागवत यांनी राज यांना भेटण्यापूर्वी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सांत्वन केलं. त्यानंतर सरसंघचालकांनी राज ठाकरेंच्या कृष्कुंज या निवासस्थानी जाऊन त्यांचं सांत्वन केलं. तसंच
दरम्यान, कसाबच्या फाशीबद्दल भागवत यांनी समाधान व्यक्त करत देर आए दुरूस्त आयें, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, कसाबला फाशी झाली, आता अफझल गुरूला फाशी कधी होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.