वांद्रे-वरळी सी लिंकजवळ तरुणीचा मृतदेह आढळला

By Aparna Deshpande | Last Updated: Monday, September 23, 2013 - 08:13

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या वांद्रे सी लिंकजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आलाय. हा मृतदेह दोन भागात कापण्यात आल्याचं समोर आलंय. या महिलेचं वय जवळपास २५ वर्ष होतं. हत्येचं कारण अजून असप्ष्ट आहे.
वांद्रे-वरळी सी लिंकवर दुर्गंधी येत असल्यामुळे लोकांनी पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलिसांनी पाहणी केल्यानंतर त्यांना या महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांना केवळ या महिलेचा कमरेपासून खालील मृतदेह आढळून आलाय.
या तरुणीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी धारदार शस्त्रानं तिचे तुकडे केल्याची शक्यता आहे. पोलिसांच्या मते, या तरुणीच्या कमरेखालचा भाग मिळाला असून बाकी अवयव गायब आहेत. दरम्यान या प्रकरणी सी लिंकच्या आसपासचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलं आहे.
तरुणीचे कपडे पाहून ही तरुणी उच्चभ्रू कुटुंबातील असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. सुनियोजित पद्धतीनं या तरुणीची हत्या करून तिचे तुकडे वेगवेगळ्या पिशवीत भरून रेक्लेमेशन आणि वांद्रे-वरळी सी लिंकजवळ फेकल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 23, 2013 - 07:55
comments powered by Disqus