मुंबई एसी लोकलचा प्रवास स्वप्नच! नवीन गाड्यांचे एसी नादुरुस्त

एसी लोकलचा प्रवास अजून लांबलाय, रेल्वेने एसी लोकलचं दिलेलं स्वप्न त्यांचाच अंगलट आल्याचं चित्र सध्या दिसत आहे.

Updated: Sep 27, 2016, 01:34 PM IST
मुंबई एसी लोकलचा प्रवास स्वप्नच! नवीन गाड्यांचे एसी नादुरुस्त title=

मुंबई : एसी लोकलचा प्रवास अजून लांबलाय, रेल्वेने एसी लोकलचं दिलेलं स्वप्न त्यांचाच अंगलट आल्याचं चित्र सध्या दिसत आहे.

चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीत तयार झालेल्या एसी लोकलच्या एसी खराब आहेत. त्यामुळे ही एसी लोकल मुंबईत पोहचल्यानंतरही त्याची ट्रायल होऊ शकलेली नाही.

युपीए सरकारने 2012-13 च्या रेल्वे बजेटमध्ये या एसी लोकलची घोषणा केली होती. तसेच एसी लोकल जुलै 2014 पर्यंत धावेल अशी घोषणाही केली होती.

मात्र, सप्टेंबर 2016 संपत आले तरी ही लोकल अजूनही धूळ खात पडली आहे. एसी लोकलच्या प्रवासासाठी मुंबईकरांना अजून किती वेळ प्रतिक्षा करावी लागेल हे मात्र निश्चित नाही.