मुंबई-अहमदाबाद मार्गावर 7 जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई-अहमदाबाद हायवेवर टँकर पलटल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अपघातानंतर टँकरनं अचानक पेट घेतला. आणि यामध्ये सात जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 22, 2014, 08:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई-अहमदाबाद हायवेवर टँकर पलटल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अपघातानंतर टँकरनं अचानक पेट घेतला. आणि यामध्ये सात जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले आहेत.
काही जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डहाणूच्या चारोटी नाक्यावरील ही घटना आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर डहाणू -चारोटी नाक्याजवळ एक टँकर उलटून स्फोट होऊन आग लागली. आग मोठी असल्याने प्रचंड धुरांचे लोट हवेत दिसत होते. शनिवारी दुपारी केमिकल घेऊन जाणारा हा टँकर अचानक उलटला आणि त्याने पेट घेतला. या अपघाताता २ मुलांसह ५ प्रौठ नागरिक ठार झालेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर खबरदारी म्हणून दोन्ही मार्गांवरील वाहने १०० मीटर अंतरावरच थांबवण्यात आली असून त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. या आगीमुळे काही गाड्यांचेही नुकसान झाले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.