सीएसटी रेल्वे स्थानक आणि मुंबई विमानतळाचं नाव बदललं

रेल्वे स्थानकाचं नाव आता बदललं

Updated: Dec 8, 2016, 03:49 PM IST
सीएसटी रेल्वे स्थानक आणि मुंबई विमानतळाचं नाव बदललं title=

मुंबई : आधी व्हीटी आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानकाचं नाव आता बदलण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस या नावात थोडा बदल करण्यात आला आहे. सीएसटी स्थानकाचं नाव आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं असणार आहे. मुंबई सीएसटी आणि मुंबईच विमानतळाच्या नावात महाराज हा शब्द घालण्याच्या प्रस्तावाला आज राज्याच्या मंत्रीमंडळानं मंजूरी दिली आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव देखील बदलण्यात आलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं असणार आहे.

सीएसटी स्थानक आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ही मुंबईची खास ओळख आहे. इंग्रजांच्या काळात हे स्थानक व्हीटी नावाने ओळखलं जात होतं. बोरीबंदर या नावाने देखील काही दिवस ते ओळखलं जात होतं. 1 मार्च 1996 मध्ये या स्थानकाचं नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस केलं गेलं.

मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक आणि सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. युनेस्कोचा जागतिक वारसा असणारा आणि त्यासोबत हे मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेल्या हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले होते.