मुंबईत बेस्ट बसच्या भाड्यात वाढ

मुंबईकरांच्या खिशाला आणखी चाट पडणार आहे. महागाईचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. मुंबईच्या बेस्ट बसच्या भाड्यात १ एप्रिलपासून वाढ होणार आहे.

Updated: Mar 29, 2013, 10:40 AM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईकरांच्या खिशाला आणखी चाट पडणार आहे. महागाईचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. मुंबईच्या बेस्ट बसच्या भाड्यात १ एप्रिलपासून वाढ होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी जास्त होणाऱ्या भाडेवाडीला सामोरे जावे लागणार आहे.
बेस्ट बसच्या भाड्यात १ रुपयाने वाढ करण्यात आली आहे. नव्याने होणारी ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यामुळे २ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचं भाडं ५ वरून ६ रुपये होणार आहे. त्यानंतर प्रत्येक टप्प्याचं तिकीट १ रुपयानं महागणार आहे.
एसी बसचं पहिल्या २ किलोमीटरचं भाडं १५ वरून २० रुपयांवर जाणार आहे. यापूर्वी गेल्यावर्षी २७ एप्रिल रोजी बेस्टनं भाडेवाढ केली होती. तेव्हा तब्बल २ वर्षांनी बेस्टची तिकिटं महागली होती. तर आता जवळजवळ वर्षभरातच नव्याने भाडेवाढ करण्यात आली आहे.