बेस्टची मुंबईकरांना गुडन्यूज, दैनंदिन पासमध्ये मोठी कपात

 गणेशोत्सवाच्या तोंडावर बेस्टनं मुंबईकरांना गुडन्यूज दिली आहे. उद्यापासून बेस्टच्या दैनंदिन पासमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात होते आहे.

Updated: Sep 15, 2015, 03:09 PM IST
 बेस्टची मुंबईकरांना गुडन्यूज, दैनंदिन पासमध्ये मोठी कपात title=

मुंबई : गणेशोत्सवाच्या तोंडावर बेस्टनं मुंबईकरांना गुडन्यूज दिली आहे. उद्यापासून बेस्टच्या दैनंदिन पासमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात होते आहे.

आतापर्यंत बेस्टच्या पासचा दर सरसकट ७० रुपये आकारण्यात येत होता. मात्र आता विविध श्रेणी निश्चित करण्यात आल्यात. शहर, उपनगर, मुंबईबाहेर आणि एसी बस अशा चार श्रेणींमध्ये हे दर असतील... तसंच मासिक आणि त्रैमासिक पासचे दरही घटवण्यात आलेत...

नवे दर कसे आहेत 

 

प्रौढांसाठी : शहर ४०, उपनगर ५० तर मुंबईबाहेर ७० आणि एसीसाठी २०० रुपये

बालकांसाठी : शहर २०, उपनगर २५  तर मुंबईबाहेर ३५ आणि एसीसाठी १०० रुपये

मासिक :  शहर ९७५, उपनगर १२०० तर मुंबईबाहेर १७०० 

त्रैमासिक : शहर २८२५ , उपनगर ३४७५  तर मुंबईबाहेर ५०४०

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.