मुंबई महापालिकेचं ‘मराठी प्रेम’ वार्षिक १०७ कोटींचं! Mumbai Corporation have to pay 107 crores due to Marathi

मुंबई महापालिकेचं ‘मराठी प्रेम’ वार्षिक १०७ कोटींचं!

मुंबई महापालिकेचं ‘मराठी प्रेम’ वार्षिक १०७ कोटींचं!
www.24taas.com , वृत्तसंस्था,मुंबई

२०११ मध्ये मुंबई पालिकेने पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रोत्साहन बक्षिसाची योजना सुरू केली. प्रोत्साहन म्हणून दोन वेतनवाढ देण्याचे घसघशीत बक्षिस ठरविण्यात आले होते. या बक्षिसामुळे कारकून विभागातील शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढेल, असा अंदाज होता.

मात्र, मराठीत शिक्षण घेणारे वाढल्यामुळे बक्षिसाची रक्कम कमी करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. या वेतनवाढीचा लाभ घेण्यासाठी पालिकेच्या डॉक्टर आणि अभियंत्यांमध्येच स्पर्धा सुरू झाली. याचा भार तिजोरीवर वाढल्यामुळे ही योजना पालिकेसाठी डोकेदुखीची ठरत आहे.

त्यानुसार यापुढे एक वेतनवाढ किंवा १५ हजार रुपये बक्षिस देण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीपुढे प्रशासनाने मांडला आहे. ३० टक्के कर्मचार्यांरनी जरी पदव्युत्तर शिक्षण घेतले तर १०७ कोटींचा आतिरिक्त वार्षिक भार पडू शकतो. त्यामुळे यापुढे मराठीतून पदव्युत्तर शिक्षण घेणार्यान कर्मचार्यांसना दोनऐवजी एक वेतनवाढ किंवा १५ हजार बक्षीस देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. गटनेत्यांच्या बैठकीपुढे हा प्रस्ताव मंजुरीसाठी येत आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, October 06, 2013, 17:37


comments powered by Disqus