मुंबई गँगरेप : 'तो' अल्पवयीन, आजीचा दावा!

Last Updated: Saturday, August 24, 2013 - 19:57

www.24taas.com झी मीडिया, मुंबई
मुंबईमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय. या प्रकरणातला पहिला आरोपी चांद बाबू सत्तार शेख उर्फ मोहम्मद अब्दुल याच्या आजीनं चांद बाबू अल्पवयीन असल्याचा दावा केलाय.
आरोपीची आजी सारनाबाई यांनी एक प्रमाणपत्र सादर केलंय. यात चांद बाबूची जन्मतारिख २६ फरवरी १९९७ असल्याचा दावा करण्यात आलाय. चांदला शुक्रवारी २२ वर्षीय महिला पत्रकारावर सामूहिक बलात्कार प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलीय.
मुंबई पोलिसांनी मात्र आरोपीच्या नातेवाईकांचा हा दावा फेटाळून लावलाय. प्रमाणपत्रामध्ये खाडाखोड केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय तसंच आरोपीचं वय १९ वर्ष असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. चांद बाबूला याअगोदर दोन वर्षांपूर्वीही एकदा अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याचं वय १७ वर्ष नोंदविलं गेलं होतं.

नातेवाईकांकडून आरोपींचा बचाव करण्यात येत असला तरी महिला पत्रकारावरील या अमानुष अत्याचारांचा झी मीडिया निषेध करतंय.झी मीडियाच्या सर्व पत्रकारांनी दंडाला काळ्या फिती लावून काम केल आहे. या आरोपींना कठोर शिक्षा करा अशीच मागणी `झी मीडिया` च्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
इतर दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २० पेक्षा जास्त पथकं कार्यरत आहेत. ही पथकं मुंबई आणि इतर परिसरात आरोपींचा कसून तपास करत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 24, 2013 - 19:27
comments powered by Disqus