मुंबई गँगरेप: हे तर ‘सीरियल रेपिस्ट’, ६ महिन्यात १० बलात्कार

By Aparna Deshpande | Last Updated: Thursday, September 5, 2013 - 10:13

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मुंबई गँगरेप प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. महालक्ष्मीच्या शक्तीमील कम्पाऊंडमध्ये गँगरेप करणाऱ्या ८ जणांची टोळीच असल्याचं आम्ही काल दाखवलं. त्यानंतर आता या टोळक्यानं १० महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय.
यात पाच गँगरेपच्या घटना आहेत. फोटो जर्नलिस्टवर झालेल्या बलात्कारानंतर या टोळीची कृष्णकृत्य जगासमोर आली. त्यानंतर ३१ जुलैला याच टोळक्यानं गँगरेप केलेली आणखी एक तरुणी पुढे आली. या तक्रारीनंतर आणखी तिघंजण यात असल्याचं स्पष्ट झालंय. यातल्या एकाला पोलिसांनी अटक केली असून टोळक्यातले अन्य दोन साथीदार फरार आहेत.
२२ ऑगस्टला शक्ती मिल कंपाऊंडमध्ये आपल्या सहकाऱ्याबरोबर कामानिमित्त गेलेल्या महिला फोटोग्राफरवर गँगरेप झाला. त्यानंतर सलिम अन्सारी, विजय जाधव, मोहम्मद कासिम, कासिम बंगाली आणि सिराज रेहमान या पाचही आरोपींना अटक करण्यात आली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओFirst Published: Wednesday, September 4, 2013 - 12:05


comments powered by Disqus