मुंबई गँगरेप : नेमकं काय घडलं ‘त्या’ दिवशी!

महालक्ष्मी येथे फोटो जर्नलिस्ट तरुणीला बीअरच्या फुटलेल्या बाटलीचा धाक दाखवून त्या सहा नराधमांनी बलात्कार केला होता, अशी धक्कादायक माहिती त्या तरणीने दिलेल्या जबानीतून समोर आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 24, 2013, 10:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महालक्ष्मी येथे फोटो जर्नलिस्ट तरुणीला बीअरच्या फुटलेल्या बाटलीचा धाक दाखवून त्या सहा नराधमांनी बलात्कार केला होता, अशी धक्कादायक माहिती त्या तरणीने दिलेल्या जबानीतून समोर आलीय. हा प्रकार घडण्याआधी त्या तरुणींच्या आईचा फोन आला होता, पण नराधमांनी धमकावल्यामुळे त्या मुलीला आपण ठिक आहोत असचं सांगावं लागलं. अतिशय क्रूरपणे त्या नराधमांनी तरुणींच्या शरीराचे लटके तोडल्याचं जबानीतून समोर आलाय. या ‘निर्भया’नं पोलिसांना दिलेला जबाब तिच्याच शब्दांत...
काय काय घडलं त्या दिवशी...
महालक्ष्मी इथल्या शक्ती मील कम्पाऊंडमध्ये करण्यात आलेला सामूहिक बलात्कार हा माणुसकीला काळीमा फासणाराच... पीडित तरुणीच्या जबाबातून त्या वासनांध राक्षसांचा कृर चेहरा समोर आलाय. या घटनेच्या वेळी तरुणीला तीच्या आईचा फ़ोन आला होता. पण, नराधमांनी बीअरच्या फुटलेल्या बाटलीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्या मुलीच्या आईने एकदा नव्हे तर दोनदा मोबाइलवर संपर्क साधून सर्व काही ठीक आहे ना? अशी विचारपूस केली होती. पण त्या नराधमांच्या धाकापुढे त्या तरुणीचा नाईलाज झाला. आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणेच आईला सारे ठिक असल्याचं सांगावं लागलं आणि त्यानंतर त्या नराधमांनी त्या तरुणीच्या शरीराचे लचके तोडले.
पीडित फ़ोटो जर्नालिस्ट तरुणींने पोलिसांना दिलेल्या जबानीनुसार, तिनं डिप्लोमा इन कम्युनिकेशन कोर्स केल्यानंतर, मे महिन्यात एका इंग्रजी मासिकात इंन्टर्न फोटोग्राफर म्हणून कामाला लागली होती. गुरुवारी दुपारी साधारण एक वाजता ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर पाच वाजेपर्यंत तीनं काम केलं आणि त्यानंतर ऑफिसने दिलेली बातमी करण्यासाठी ती तिच्या सहका-याबरोबर शक्ती मिल कपाउंडमधील पडक्या इमारतींची छायाचित्रे काढण्यासाठी महालक्ष्मी स्थानकाच्या फलाट क्रमांक-१ वरून चालत आत गेली. त्यावेळी या गिरणीतून बाहेर पडणा-या दोन व्यक्तींना आत जायच्या रस्त्याबाबत त्यांनी विचारले असता त्यांनी आत जाण्याचा मार्ग सांगितला. पण त्या तरुणीला काय माहित की त्या दोन तरुणांनी सांगितलेल्या रस्त्यावर गेल्यास आपलं आयुष्य उद्वस्त होणार आहे. हे तेच दोन तरुण होते ज्यांनी या तरुणीवर अमानुष अत्याचार केला. पुढे कम्पाऊंडमध्ये आत गेल्यावर त्या तरुणीने तिच्या मोबाईलवरून तर तिच्या सहका-याने त्याच्याकडील कॅमेऱ्यातून इमारतींची विविध छायाचित्रे काढण्यास सुरूवात केली. साधारण साडेसहाच्या सुमारास छायाचित्रे काढून झाल्यावर बाजूलाच रस्ता दिसत असल्यामुळे दोघेही तिथूनच बाहेर जाणार, तोच ज्यांनी रस्ता दाखवला होता, ते पुन्हा तेथे आले. त्यावेळी त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीने हिंदीत सांगितले, ‘हमारे शेठने आपको देखा है, और आपको शेठके पास आना पडेगा.’ त्यावर त्या धाडसी तरुणीने ‘मै तुम्हारे शेठसे बात करती हूँ’ असं सांगितलं. तेव्हा त्यांनी फोनवरुन बातचीत करण्यास नकार दिला. आणि जबारदस्तीने त्या दोघांना शेठकडे घेऊन जाऊ लागले. तितक्यात त्या तरुणींने आपल्या ऑफिसमध्ये संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैव म्हणून की काय ऑफिसचा फ़ोन लागलाच नाही. तोपर्यंत ते सर्व मिलच्या पडक्या भागात आले होते. अचानक त्या फोटो जर्नलिस्ट तरुणीला तिच्या ऑफिसमधील फोटोग्राफर प्रमुखाचा फोन आला, त्या तरुणीने घडत असलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. त्या ताबडतोब तिथून बाहेर पडा असं त्या दोघांना सांगितलं. पण, त्या पा़च नराधमांना जे करायचा होतं त्यांनी ते केलच. त्या तरुणीला आणि तिच्या बरोबर असलेल्या तिच्या सहकारीला आरोपींपैकी तिसऱ्या व्यक्तीने ‘काही दिवसांपूर्वी येथे मर्डर झाला होता आणि तो तूच केला’, असे सांगत आणखी दोन साथीदारांना दूरध्वनी करून बोलावून घेतले. त्यावर त्या तरुणींने आणि तिच्या सहकारीने त्यांना सोडण्यासाठी झटापट करू लागले. पण त्या नराधमांनी त्या दोघांचे काहीच ऐकलं नाही. आणि तरुणीच्या साथीदाराला मारहाण करून पट्टयाने आणि दोरीने बांधून ठेवले. त्यावर त्या दोघांनीही या दोघांकडचा मोबाइल व कॅमेरा ३० हजारपेक्षा जास्त रकमेचा आहे, तो ठेवा आणि आम्हाला सोडा अशी विनंती त्या नराधमांना केली. पण त्याचा काही एक परीणाम त्या पाच नराधमांवर झाला नाही.

त्यानंतर त्या पाच नराधमांपैकी एक मिशीवाला आणि रस्ता दाखवणाऱ्यांबरोबर नंतर आलेला एक अशा दोघा आरोपींनी त्या तरुणीला एका बाजूला नेले. त्याच वेळीस तरुणीच्या आईचा फोन आला. जणू आपल्या मुलीवर काही तरी संकंट ओढावलय अशी चाहूल त्या आईला लागली असावी, ‘तु कुठे आहेस, ठिक आहेसना, घरी कधी येणा