मुंबई गँगरेप प्रकरणातील आरोपींवर आज आरोप निश्चिती

By Surendra Gangan | Last Updated: Friday, October 11, 2013 - 13:03

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या शक्ती मिल गँगरेप प्रकरणातील आरोपींवर आज सेशन कोर्टात आरोप निश्चिती करण्यात येणार आहे. या बलात्कार प्रकरणातील पाच आरोपींनी २२ ऑगस्ट रोजी एका फोटो जर्नलिस्टवर सामूहिक बलात्कार केला होता.
या घटनेनंतर पोलीसांनी तात्काळ या नराधमांना अटक केली होती इतकंच नव्हे तर २८ दिवसांत या आरोपींविरोधात ६०० पानी चार्जशीटही दाखल केली होती. या चार्जशिटमध्ये पीडीत तरुणीसह अन्य ८६ जणांचे जबाब नोंदवण्यात आलेत. तसेच घटनास्थळाव आढळून आलेले पुरावे, आरोपींच्या मोबाईल फोनचे रेकॉर्ड, आरोपींच्या डीएनए चाचण्या यांचाही समावेश करण्यात आलाय.
महालक्ष्मी परिसरातल्या शक्ती मिलमध्ये महिला पत्रकारावर पाच नराधमांनी २२ ऑगस्टला बलात्कार केला होता. त्याला एक महिना पूर्ण होण्याआधीच मुंबई क्राईम ब्रांचनं या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलंय. हे प्रकरण जलद गतीनं चालावं आणि निकाल लवकर लागावा यासाठी फ़ास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवण्याची मागणी केली.
दिल्लीत झालेल्या गँगरेप प्रमाणंच शक्ती मिलमध्ये महिला पत्रकारावर अमानुष बलात्कार करणाऱ्या आरोपींवर गुन्हा सिद्ध होईल आणि त्यांनाही कठोर शिक्षा होईल, असा विश्वास मुंबई पोलिसांनी व्यक्त केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, October 11, 2013 - 12:43
comments powered by Disqus