आयआयटी विदयार्थीनीवर कर्मचाऱ्यांनी केला बलात्कार

By Rohit Gole | Last Updated: Monday, August 13, 2012 - 17:02

www.24taas.com, मुंबई
आयआयटी मुंबईच्यात एका विद्यार्थिनीवर कॅम्पलसमध्येच बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बलात्काराचा आरोपी संस्थेचाच कर्मचारी असल्याची माहिती आहे. २६ वर्षीय पिडीत विद्यार्थिनी आयआयटीमध्ये पीएचडी करीत आहे.

शनिवारी सकाळी विद्यार्थिनीवर बलात्कार झाला. तिला गंभीर जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ती जबाब नोंदविण्याच्या परिस्थितीत नव्हती.
रविवारी रात्री उशीरा तिच्यार प्रकृतीत सुधारणा झाली. तिची वैद्यकीय तपासणी करण्या त येणार असून त्यानंतर तिचा जबाब नोंदविण्यात येईल. त्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

First Published: Monday, August 13, 2012 - 17:02
comments powered by Disqus