कारमध्ये सापडला महिलाचा मृतदेह

By Prashant Jadhav | Last Updated: Monday, February 4, 2013 - 11:17

www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकूल परिसरात एका बदं कारमध्ये एक कुटुंब बांधलेल्या अवस्थेत सापडलय. कारमध्ये सापडलेल्या या कुटुंबातल्या महिलेचा मृत्यू झालाय.
आयशा शेख असं मृत महिलेचं नाव आहे. तिचा पती सलमान शेख आणि दोन मुलांसोबत ते फिरायला म्हणून वांद्र्याच्या घरातून बाहेर पडले होते. काही वेळानंतर त्यांच्या नातेवाईकांना एक अज्ञाताचा फोन आला. त्यानं दिलेल्या माहितीनुसार बीकेसी परिसरातील पुलाशेजारी कारमध्ये कुटुंबीयांना बांधून ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर कारमध्ये दोघंही दांपत्य बांधलेल्या अवस्थेत सापडली. त्यांच्या मांडीवर मुलांना ठेवण्यात आलं होतं. बेशुद्धअवस्थेत सापडलेल्या दांपत्यापैकी महिलेचा मृत्यू झाला. तर पतीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. महिलेची हत्या करुन नव-यानेच बनाव रचल्याचा संशय पोलिसांना आहे.

First Published: Monday, February 4, 2013 - 11:17
comments powered by Disqus