डेंग्यू हा मीडियानं मोठा केलेला आजार, महापौरांची मुक्ताफळं

मुंबईमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना महापौर स्नेहल आंबेकरांना मात्र हा आजार मीडियानं मोठा केल्याचा भ्रम झालाय. त्यांनी आज राजावाडी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना हा डेंग्यू मीडियानं मोठा केलाय, त्यामुळं मी आज इथं भेट दिली, असं त्या म्हणाल्या. 

Updated: Nov 11, 2014, 05:07 PM IST
डेंग्यू हा मीडियानं मोठा केलेला आजार, महापौरांची मुक्ताफळं title=

मुंबई: मुंबईमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना महापौर स्नेहल आंबेकरांना मात्र हा आजार मीडियानं मोठा केल्याचा भ्रम झालाय. त्यांनी आज राजावाडी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना हा डेंग्यू मीडियानं मोठा केलाय, त्यामुळं मी आज इथं भेट दिली, असं त्या म्हणाल्या. 

केईएममध्ये एका डॉक्टरचा मृत्यू, अन्य सहा डॉक्टर्सना लागण, रुग्णालयाच्या आवारात आळ्यांची पैदास, शहरात १२ मृत्यू, ७०० पेक्षा जास्त जणांना लागण अशी स्थिती असताना महापौरांना मात्र हा मीडियानं मोठा केलेला आजार वाटतोय. 

गेल्या वर्षीपेक्षा रुग्ण वाढल्याचं त्या एकीकडे मान्य करतायत तर त्याच वेळी मृत्यू कमी झाल्यात धन्यता मानतायत. तसंच घराघरात तपासणी करणं ही महापालिकेची जबाबदारी नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. 
झी मीडियानं महापौरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतल्यानंतर त्यांनी फोनवरून दिलगिरी व्यक्त केली.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.