मुंबई मेट्रो विस्कळीत... १५-२० मिनिटे उशीरानं!

ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झालेली मुंबई मेट्रो सेवा पूर्वपदावर आलीय. 

Updated: Mar 30, 2015, 01:28 PM IST
मुंबई मेट्रो विस्कळीत... १५-२० मिनिटे उशीरानं! title=

मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झालेली मुंबई मेट्रो सेवा पूर्वपदावर आलीय. 

आज सकाळच्या सुमारास मुंबई मेट्रो तांत्रिक कारणांमुळं विस्कळीत झाली होती. घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान सुमारे पंधरा ते वीस मिनिटे मेट्रो उशिरानं धावत होत्या. यावेळी मेट्रो स्टेशन्सवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

मेट्रो विस्कळीत झाल्याबद्दल प्रवाशांना अनाऊन्समेंट करुन कोणतीही माहिती देण्यात येत नव्हती. तसंच इंडिकेटर्सवरही माहिती देण्यात न आल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळाचं आणि संतापाचं वातावरण होतं. अखेर तासाभरानंतर मेट्रो सेवा पूर्ववत सुरु झाली. 

वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळं मेट्रो सेवेवर परिणाम झाल्याचं सांगण्यात आलंय. मात्र, याचा मनस्ताप कामावर जाणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.