प्रीती राठी अॅसिड हल्लाः आरोपी सापडला

मुंबईतल्या प्रीती राठी ऍसिड हल्ला प्रकरणातल्या आरोपीला अटक करण्यात आलीय. अंकूर पालीवाल असं या आरोपीचं नाव असून त्याला मुंबई क्राईम ब्रँचनं नवी दिल्लीत अटक केलीय.

प्रशांत जाधव | Updated: Jan 17, 2014, 03:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या प्रीती राठी ऍसिड हल्ला प्रकरणातल्या आरोपीला अटक करण्यात आलीय. अंकूर पालीवाल असं या आरोपीचं नाव असून त्याला मुंबई क्राईम ब्रँचनं नवी दिल्लीत अटक केलीय.
प्रितीचे कुटुंबीय आणि पालीवाल कुटुंबीय एकमेकांच्या परिचयाचे होते. प्रीती ज्या पद्धतीनं प्रगती करत होती त्यावरुन अंकूरचे वडील सतत त्याला बोलत असतं हाच राग मनात धरुण अंकुरनं प्रीतीवर वांद्रे स्टेशनवर ऍसिड हल्ला केला होता.
गेल्या वर्षी मे महिन्यात वांद्रे टर्मिनसवर झालेल्या अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या अवघ्या २३ वर्षांच्या प्रीती राठी हिचा १ जून २०१३ रोजी मृत्यू झाला. हल्ल्यानंतर तिची प्रकृती स्थिर होती परंतू नंतर तिची अवस्था गंभीर झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
दिल्लीहून नौदलाच्या हॉस्पिटलमधील नोकरीवर रुजू होण्यासाठी मुंबईत आलेल्या प्रीती हिच्यार २ मे रोजी अज्ञात तरुणाने अॅसिड हल्ला केला होता. या हल्ल्यात प्रीतीच्या एका डोळ्याला दुखापत झाली होती, तर अॅसिडचे काही थेंब तोंडातही गेल्याने अन्ननलिकेला मोठ्या प्रमाणावर इजा पोहोचली होती. ‌तिच्यावर भायखळ्याच्या मसीना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, पुढील उपचारांसाठी आवश्यक असलेल्या कार्डिओ थोरॅसिक सर्जरीची सुविधा या हॉस्पिटलमध्ये नसल्याने तिला १८ मे रोजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं होतं. त्यानंतर ती व्हेन्टिलेटरवरच होती. अॅसिडमुळे तिच्या शरिरातला एकेक अवयव निकामी होत गेला आणि अखेर आज तिची मृत्यूशी झुंज संपली.
कुलाबा येथील मेडिकल कॉलेजमधील लेफ्टनंट पदासाठी देशभरातून १५ मुलींची निवड झाली होती; त्यात प्रीतीचाही समावेश होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.