गोविंदांशी आज पंगा नको; सावध भूमिका

सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त थर लावणाऱ्या गोविंदा पथकावर कारवाई होणार आहे, मात्र आज गोविंदा पथकांना प्रमाणपेक्षा जास्त थर लावले तरी पोलीस विरोध करणार नसल्याचं सांगण्यात येतंय. 

Updated: Aug 25, 2016, 09:48 AM IST
गोविंदांशी आज पंगा नको; सावध भूमिका title=

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त थर लावणाऱ्या गोविंदा पथकावर कारवाई होणार आहे, मात्र आज गोविंदा पथकांना प्रमाणपेक्षा जास्त थर लावले तरी पोलीस विरोध करणार नसल्याचं सांगण्यात येतंय. 

कोणत्या गणेश मंडळाने किती थर लावले हे पाहण्यासाठी बहुतांश दहिहंडींचं थर लावताना चित्रिकरण करण्यात येणार आहे, यानंतर कारवाईचा बड़गा उगारण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय.

आधी दहिहंडीचं चित्रिकरण पाहण्यात येईल. यात मर्यादेपेक्षा जास्त थर लावलेले दिसून आल्यानंतरच कारवाई होणार आहे. लगेच कारवाई न करण्याचा पोलिसांचा निर्णय कदाचित कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी असेल, कारण लगेच कारवाई झाल्यास गोविंदा पथकांचा संताप अनावर होण्याची शक्यता आहे.